बुधवार, २२
सप्टेंबर २०२१ पासून सर्व ३१६ केंद्रांवर होणार लसीकरण
कोविड-१९
प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मर्यादीत प्रमाणात लससाठा उपलब्ध असल्यामुळे
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३१६ पैकी ७३ निवडक महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण
केंद्रांवर उद्या मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०२१ रोजी लसीकरण सुरु राहणार आहे.
सदर ७३ लसीकरण केंद्रांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांवर प्रकाशित करण्यात आली आहे.
दरम्यान,
आज (दिनांक २० सप्टेंबर २०२१) रात्री उशिरापर्यंत महानगरपालिका प्रशासनाला कोविड
लससाठा उपलब्ध होणार आहे. या साठ्याचे वितरण उद्या मंगळवार, दिनांक २१ सप्टेंबर
२०२१ रोजी दिवसभरात विविध शासकीय व महानगरपालिका केंद्रांना करण्यात येईल.
त्यामुळे बुधवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२१ पासून सर्व ३१६ शासकीय व महानगरपालिका
केंद्रांवर लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु होईल.
सदर ७३ लसीकरण केंद्रांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांवर प्रकाशित करण्यात आली आहे.
लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून
मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई
महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या