Ticker

6/recent/ticker-posts

विघ्नहर्त्याला आज निरोप

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत कोविडच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जन यंदाही साध्या पद्धतीने होणार आहे. विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पालिकेनेही जय्यत तयारी केली आहे. मुंबईत घातपाती कारवाया करण्याचा दहशतवाद्यांचा कट उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर ठीकठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलीस नाक्यानाक्यावर लक्ष ठेवून आहेत. अनेक भागांत पोलिसांचे पेट्रोलिंगही वाढविण्यात आले आहे. 

पोलिसांची अतिरिक्त कुमक राज्य राखीव दल, केंद्रीय राखीव बल, आणि ५०० च्या आसपास होमगार्डचे जवानही तैनात असणार आहेत. प्रत्यक्ष विसर्जनाला मनाई असल्याने पालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांवर मूर्तीदान करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

























photo: Viral

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या