Ticker

6/recent/ticker-posts

काम चालू असताना बीकेसीतील ब्रिज कोसळला

मुंबई : काल शुक्रवारी बांधकाम सुरु असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळून १४ मजूर गंभीर जखमी झाले. बीकेसीच्या मुख्य रस्त्याला  जोडणारा  सांताक्रूझ -चेंबूर लिंक रोडचे बांधकाम सुरु आहे. मुंबईतील बांद्रा- कुर्ला संकुल परिसरात शुक्रवारी  बांधकाम सुरु असलेला उड्डाणपूल कोसळल्याची घटना घडली आहे.  या दुर्घटनेत १४ मजूर जखमी  आहेत. 

उड्डाणपुलाचे काम सुरु  असल्याने काही मजूर पुलावर उपस्थित होते.  त्यावेळी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास या पुलाचा एक गर्डर खाली कोसळला. यावेळी पुलावरील ८ ते १० मजूर खाली  कोसळले. या सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती  पोलिसांनी दिली. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या