Ticker

6/recent/ticker-posts

कॉल सेंटरमध्ये बेरोजगारांना गंडा

नोएडातून महिलेसह तिघांना अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : लॉक डाऊन आणि कडक निर्बंधांमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली असून नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना फसवणाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशाचप्रकारे ऍक्सिस बँकेत नोकरी लावण्याच्या भूलथापा देऊन तरुण-तरुणींची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड पायधुनी पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. बोगस कॉल सेंटर चालवून हे सर्वजण बेरोजगारांना गंडा घालत होते.

दि. १२/०४/२०२१ रोजी ते दि.२२/०४/२०२१ रोजी पर्यंत आरोपितांनी Noukri.com या ठिकाणाहून बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांना अक्सिस बँक मध्ये नोकरी देणाचे आमिष दाखवून बँकेचा बोगस इमेल इआयडी आणि Noukri.com चे बोगस डोमेन तयार करून वेगवेगळे चार्जेस फी भरण्याची मागणी करून लाभार्थी कोटक बँक व Mobikwik Wallet द्वारे Yes बँक या खात्यात एकूण ०१,३८,८१७/- रुपये भरणा करण्यास सांगून त्यांची फसवणूक केली. तसेच नोंदणीशुल्क, मुलाखतशुल्क, पोलीस पडताळणी अशी वेगवेगळी कारणे सांगून पैसे देऊनही आणखी पैशाची मागणी होत होती. यावर तक्रारदार महिलेला संशय आला आणि तिने दिलेले पैसे परत मागितले असता समोरचया व्यक्तीने संपर्कच तोडला. फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच तिने पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

चौकशी करीत असताना आरोपी १)  कैलाश राम चंद , वय २८ वर्षे, राठी. ए ब्लॉक खोली क्र ६०१, गली न १३, प्रताप नगर, पूर्व दिल्ली. पत्ता एम एस कॉम्प्लेक्स, गली न २, घर न १००, गाव-ममुरा, सेक्टर-५९ नोएडा, उ.प्रदेश २)  सतीश कुमार कल्याण सिंग, वय २७ वर्षे, राठी. करण पूर कला, पो अनुपसेर, त-अनुपसेर, जि.बुलदंशहर उ.प्रदेश. पत्ता एम एस कॉम्प्लेक्स, गली न २,घर न १००, गाव-ममुरा, सेक्टर-५९, नोएडा, उ.प्रदेश, ३) श्रीमती गीता तेजवीर सिंग, वय २७ वर्षे, राठी. ए ब्लॉक खोली क्र ७८१, गली न १५ , प्रताप नगर, पूर्व दिल्ली. पत्ता  एम एस कॉम्प्लेक्स, गली न २, घर न १००, गाव-ममुरा, सेक्टर-५९ नोएडा, उ.प्रदेश. यांना अटक केली आहे.

अप्पर पोलीस आयुक्त, दप्रावि आणि मा पोलीस उपायुक्त सो, परि २ यांचे मार्गदर्शनाप्रमाणे आणि सपोआ सो,पायधुनी विभाग मा. वपोनि, पायधुनी यांचे देखरेखीखाली, सपोनि बनकर, व पथक यांना दिल्ली व नोएडा परीसरात रवाना करण्यात आले होते. सदर पथकाने नमूद  ठिकाणी  गुन्ह्यात वापरलेले मोबाईल व लाभार्थी खात्यातून ज्या एटीएम मधून पैसे निघाले त्याचा अभ्यास व तांत्रिक विश्लेषण करून तपास करण्यात आला. यातील अटक व पाहिजे आरोपी हे नोएडा येथील ममुरा गावात घर भाड्याने घेऊन कॉल सेण्टर चालवून फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडुन  मालमत्ता व गुन्ह्यात वापरलेले वस्तू हस्तगत केले आहे. नमूद तिनही आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित रकमेबाबत व त्यांनी अद्यापपर्यंत अशा प्रकारे किती लोकांची फसवणूक केली  याबाबत पुढील तपास चालू आहे. सदर आरोपींना दि. ३१ जुलै२०२१ रोजी मा. अति. मुख्य महानगर दंडाधिकारी,  शिवडी, मुंबई यांच्या न्यायालयात रिमांड करीता हजर केले असता दि. ०९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

 सदर गुन्ह्याचा छडा तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक अनंत साळुंके, पोनि साळुंखे, सपोनि निलेश बनकर, पोना शशांक चिले, पोना संदिप पाटील, पोना मुन्ना सिंग (परी. २), पोशि  गणेश ठाकूर, मपोशि दिव्या गोसावी यांनी लावला. अशी माहिती पायधुनी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष दुधगावकर यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या