मुंबई, दादासाहेब येंधे : घाटकोपर पश्चिम येथील असल्फा व्हिलेज परिसरातील नारीसेवा सदन मार्गावर असणाऱ्या श्री संकटमोचन हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबविली आहे. या चोरांनी रोख रक्कम व दोन मोबाइलही लंपास केले आहेत. ही चोरीची घटना मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी मंदिराचे महंत स्वामी रामदास महाराज यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
घाटकोपरच्या असल्फा परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. २६ जुलैच्या रात्री महंत आणि त्यांचे शिष्य मंदिरात झोपले असताना, दोन चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला व मंदिरातील दानपेटी आणि ग्रीलचे कुलूप तोडून आतील दोन मोबाइल आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले. पुढील तपास सुरू आहे.
0 टिप्पण्या