Ticker

6/recent/ticker-posts

रवीला रौप्यपदक

 भारताचा मल्ल रवी दहियाला गुरूवारी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलम्पिकमध्ये रौप्यपदक मिळाले. फ्रिस्टाईलमधील ५७ किलो गटातून रवी दहीयाने अंतिम फेरी गाठून रौप्यपदक मिळवले. मॅच सुरू असताना रशियाच्या युगुएवने २-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर रवीने पकड मिळवून २-२ अशी बरोबरी साधली. मात्र, ही आघाडी तात्पुरती ठरली. युगुएवने पुन्हा ४-२ आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत रवीने कडवी झुंज दिली. मात्र, बचाव भक्कम ठेवून रशियाच्या युगुएवने ही लढत ७-४ अशी जिंकली. 








फोटो : PTI 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या