Ticker

6/recent/ticker-posts

गोवंडीत बोगस डॉक्टरांना अटक

 वैद्यकीय परवाना नसताना थाटले होते क्लीनिक

मुंबई, दादासाहेब येंधे : शिवाजी नगर येथील झोपडपट्टी परिसरात क्लिनिक थाटून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पाच बोगस डॉक्टरांना गुन्हे शाखा युनिट- च्या पथकाने गजाआड केले आहे. औषधांचे परिणाम, दुष्परिणाम माहीत नसतानाही पाच बोगस डॉक्टर रुग्णांना वाटेल ती औषधे देत होते.

गोवंडीतील शिवाजी नगर येथील गजबजलेल्या परिसरात काही बोगस डॉक्टर क्लिनिक थाटून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची खबर पोलीस निरीक्षक हणमंतराव ननावरे यांना मिळाली होती. त्यानुसार याची गंभीर दखल घेत प्रभारी निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ननावरे, एपीआय गायकवाड, तोरसकर, गावडे, अर्चना कुदळे, मीरा देशमुख पथकाने पालिकेच्या एम वार्ड पूर्व येथील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया कोळी यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांच्या पथकाची मदत घेऊन क्षमा, रेहमत, मिश्रा, अलिशा, आसिफा या पाच बोगस डॉक्टरांच्या क्लिनिकवर छापा टाकला. त्यावेळी हे बोगस डॉक्टर नागरिकांची तपासणी करून त्यांना औषधोपचार करताना रंगेहाथ सापडले.

या बोगस डॉक्टरांकडे कोणताही अधिकृत वैद्यकीय परवाना नसून त्यांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी नसल्याचे निष्पन्न झाले आहे. हे बोगस डॉक्टर वैद्यकीय शिक्षण तर नाही, पण फार शिकलेले नसल्याचा संशय असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. यापुढे देखील बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या