एकुण १३ मोटार कार जप्त
दादासाहेब येंधे : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात मोटार कार चोरी करण्या-या टोळीनी धुमाकुळ घातला होता.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मोटार कार चोरी होण्याचे सत्र चालुच होते. त्यामुळे मा. पोलीस आयुक्त श्री. बिपीनकुमार सिंह, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. श्री.जय जाधव व अपर पोलीस आयुकत (गुन्हे) डॉ. श्री. बी.जे. शेखर पाटील यांनी गुन्हे शाखेतील अधिकारी व अमंलदार यांना विशेष मोहीम राबवुन मोटार कार चोरी करणा-या गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळुन वेळीच प्रतिबंध करण्याबाबत आदेशीत केले होते.
त्या अनुषगांने मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. प्रविणकुमार पाटील, मा. सहा. पोलीय आयुक्त(गुन्हे) श्री. विनोद चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा, कक्ष-१, नवी मुंबईचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुनिल शिंदे यांनी गुन्हे शाखा-१ चे पथकासह मार्च २०२१ ते जून २०२१ या कालावधीत घडलेल्या मोटार कार चोरी गुन्हयाचे खारघर, रबाळे, नेरूळ एन.आर.आय. खांदेश्वर, तळोजा, सानपाडा पोलीस ठाणे हद्दीत चोरीस गेलेल्या मोटार कारचे घटनास्थळास भेटी देवून, सीसीटीव्ही फुटेज व उपलब्ध माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले.,परंतु यश प्राप्त होत नव्हते.
१३ जून २०२१ रोजी सानपाडा पो. ठाणे येथे चोरीस गेलेल्या स्वीप्ट डिजायर कारचे घटनास्थळास पथकासह भेट देवून घटनास्थळी प्राप्त सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरूवात करुन दृढ निश्चय बनवुन आरोपिचा छडा लावण्या करीता मुंबई मेट्रोपॉलीटन भागातील ठाणे आयुक्तालयातील खडकपाडा, कल्याण, चितळसर, ठाणे, मुंबई पोलीस आयुक्तालयातील बोरीवली व मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील वसई या ठिकाणी मोटार वाहन चोरीचे गुन्हे दाखल होत असल्याची माहिती समोर आली असता सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे याचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,कक्ष-१ ची दोन तपास पथके १) वपोनि. सुनिल शिंदे, पोना/ शशीकांत जगदाळे, पोशि/ जालींदर गायकर २) सहा. पोलीस निरीक्षक हर्षल कदम, पोना/निलेश किंद्रे, पोना/भांगरे व पोशि/संतोष मिसाळ अशी तयार केली. पथक-१ यांनी खडकपाडा, कल्याण, चितळसर पोलीस ठाणे हददीतील सीसीटीव्ही फुटेज, कल्याण, डोंबिवली, ठाणे महानगरपालिका हददीतील पेट्रोल पंप व पुणे - मुंबई महामार्गावरील टोल नाक्यावरील महत्त्वाचे नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पाहीली. तसेच पथक-२ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सीबीडी, (एनआरआय, नेरूळ, सानपाडा, कळंबोली, उलवे,तळोजा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहीली असता सर्व ठिकाणी वाहन चोरी करणारे गुन्हेगार हे एकच असल्याचे निर्दशनास आले असता आरोपी हे आज चोरलेली मोटारकार पुढील दोन-तीन दिवस इतर कार चोरी करण्यासाठी वापरत असत असेही निदर्शनास आले.
त्यानंतर कळंबोली परिसरात सीसीटीव्ही फुटेजद्वारे खडकपाडा येथील चोरीस गेलेले वाहन पार्क केले असल्याचे दिसल्याने दिनांक १६/०६/२०२१ ते दि. १९/०६/२०२१ दरम्यान सदर ठिकाणी गुन्हे शाखा,कक्ष-१ चे सर्व अधिकारी व अमंलदार यांनी अहोरात्र पाळत ठेवून वाहनास जीपीएस ट्रॅकर लावले पंरतू आरोपी अटक करण्यात यश प्राप्त ह्याले नाही.
त्यानंतर पुन्हा उलवे येथे पिंपरी चिंचवड परिसरातील चोरीस गेलेले वाहन दिसून आल्याने पुन्हा दि. २६/०६/२०२१ ते दिनांक २८/०६/२०२१ या कालावधीत पाळत ठेवून प्राप्त केलेले जीपीएस ट्रॅकर लावले.
आरोपी वाहन चोरी करण्यास निघाले असता वाहनाचा २ ते ३ किमी. पाठलाग करून सुध्दा आरोपी पकडण्यात यश प्राप्त झाले नाही.
त्यानंतर पुन्हा पथक दोन मधील सपोनि हर्षल कदम, पोना/निलेश किंद्रे, पोशि/संतोष मिसाळ यांनी सतत ८ दिवस उलवे परिसरात सीसीटीव्ही फुटेज पाहीली असता आरोपी हे वाहन चोरी करण्यासाठी टुरिस्ट कारचा वापर करीत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न केले व पोना/निलेश किंद्रे हे उलवे परिसरात राहण्यास असल्याने त्यांनी नमूद वाहनाचा शोध घेवून सदरचे वाहन हे उलवे पसिरात पार्क असल्याची माहिती दिली असता, दिनांक ०९/०७/२०२१ रोजी सदर ठिकाणी दोन्ही पथक व गुन्हे शाखेचे इतर अंमलदार यांनी सापळा रचून वाहन चोरी करणारा मुख्य सुत्रधार आरोपी मोहम्मद तौफिक हबीबुल्ला यास शिताफीने अटक केली व त्याचा साथिदार मनोज गुप्ता यास लोढा हेवन सोसायटी, डोंबिवली येथून दिनांक 0९/०७/२०२१ रोजी शिताफीने अटक केली आहे.
दोन आरोपींना १) मोहम्मद तौफिक हबीबुल्ला वय ४० वर्षे सध्या रा. रूम नं. २०१, गंगासागर सोसा. सेक्टर २३ उलवे नवी मुंबई मूळ रा. नरसिंगपूर पो. शितलागंज, थाना- कंधाई तहसील पटटी, जि. प्रतापगढ राज्य- उत्तरप्रदेश २) मनोज राजेंद्र गुपता वय ३४ वर्षे रा. रूम नं. सी/0०१, यमुना बिल्डींग, लोढा हेवन, निळजे गाव, डोंबिवली ईस्ट, ठाणे मूळ रा. ग्राम बरहजपार, पो. चिलवा थाना- गेलाबाजार, जि. गोरखपूर उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे.
आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये यातील मुख्य आरोपी मोहम्मद तौफिक हबीबुल्ला हा सराईत मोटार कार चोर असून तो पार्क असलेल्या कारचे दरवाज्याची काच तोडून दरवाजा उघडतो. त्यानंतर कारचे टूल बॉक्स ओपन करतो व डी.सी.एम. सॉकेट डिसकनेक्ट करतो. त्यानंतर कारचे बोनट ओपन करून सायरन नोड डिस्कनेक्ट करतो व पुन्हा कारमध्ये जावुन ओ.सी.एम. सॉकेट बनवितो व पुन्हा खाली उतरुन एक्सटर्नल वायरने बॅटरी ते फयुज बॉक्स जोडतो.त्यानंतर आधुनिक पध्दतीचा टॅब वापरून त्यास वायफाय कनेक्ट करून वाहनाच्या स्वीच ऑन/ऑफ की वर चावी ठेवून कोड ,डिकोड करतो व डुब्लीकेट चावी बनवितो व एक्सटर्नल नट बॉक्स व बॅट-या जोडलेली वायर काढतो व डुप्लीकेट चावीने गाडी चोरी करतो.
नमूद तपासी पथकाने अथक परिश्रम करून अटक आरोपी यांचेकडून कार हस्तगत केल्या आहेत.
कक्ष १ चे अधिकारी व अंमलदार यानी अटक आरोपी यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन खालील नमुद गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच मोटर वाहन चोरी पथकाचे वपोनि. कोल्हटकर व सपोनि विजय चव्हाण व पथक यांनी नमुद आरोपींचा ताबा घेवुन आरोपीकडे कौशल्यपुर्ण तपास करुन खालील नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या ४ मोटार कार किंमत रुपये १६,५०,०००/- ची मालमत्ता हस्तगत केली आहे.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा,कक्ष-१ चे पुढील तपास पथकाने महत्त्वपुर्ण भुमिका पार पाडलेली आहे.१) श्री. सुनिल शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक २)पो.ना. अजय वाघ, ३) हर्षल कदम सहा. पोलीस निरीक्षक ४) मपोना. दिपाली सांवत, ५) राजु तडवी सहा. पोलीस निरीक्षक ६)पो.ना. रविंद्र सानप, ७)सहा. फौजदार भगवान तायडे ८)पो.ना. धनाजी भांगरे, ९)पोलीस हवा./ रोहीदास पाटील १०)पोशि/ संतोष मिसाळ, ११)पोलीस हवा. /बालाजी चव्हाण, १२)पोशि /गणेश कुटे, १३)पो.ना. निलेश किंद्रे, १४)पोशि.जालींदर गायकर १५)पो.ना. शशिकांत जगदाळे १६)सहा. फौजदार (चालक) प्रदीप लिंगाळे १७)पो.ना. दिपक मोरे १८)पो.शि(चालक) राहुल गाढवे.
प्रेस नोट


0 टिप्पण्या