लोकल प्रवासासाठी भाजपचे आंदोलन
मुंबई : सर्वसामान्यांसाठी लोकलचे दरवाजे बंद आहेत. तर लसीचे दोन डोस घेतलेल्यांना तरी लोकल प्रवासाची परवानगी मिळावी, अशी मागणी भाजपा अनेक दिवसांपासून करीत आहे. परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने भाजपने मुंबईत ठिकठिकाणी लोकल स्थानकांसमोर आंदोलन केले. भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांना रेल्वे प्रशासनाने दंड आकारून त्यांना सोडून दिले.
0 टिप्पण्या