आठवड्याचे वेळापत्रक पालिकेने केले तयार आलटून पालटून दुकाने उघडणार
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. ब्रेक दि चेन या मोहिमेअंतर्गत मुंबईतील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २। या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी मुंबई महापालिकेने दिली आहे. त्यानुसार रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूची दुकाने सुरू ठेवण्याचे वेळापत्रक करण्यात आले आहे. तर शनिवार, रविवार असे दोन दिवस सर्व दुकाने बंद राहणार आहेत.


0 टिप्पण्या