मुंबई : तथागत गौतम बुद्धांची शांती, प्रज्ञा आणि करुणेचा संदेश आज जगासाठी मार्गदर्शक असाच आहे, असे विनम्र भाव व्यक्त करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्याच्या (बुधवारी) बुद्धपौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, तथागत भगवान बुद्धांच्या जीवनातूनच आपल्याला आव्हानांवर मात करण्याची दिशा मिळते. त्यांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश आजच्या घडीला अधिक समर्पक आहे. यातच त्यांच्या विचारांची सार्वकालिकता आहे. बुद्धपौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांना कोटी कोटी प्रणाम आणि या पवित्र पर्वानिमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा.

0 टिप्पण्या