मुंबई ते कानपूर दरम्यान अतिजलद विशेष ट्रेन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, १ मे, २०२१

demo-image

मुंबई ते कानपूर दरम्यान अतिजलद विशेष ट्रेन

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबई आणि कानपूर सेंट्रल दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित अतिजलद विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिल्यानुसार: 


 *लोकमान्य टिळक टर्मिनस - कानपूर सेंट्रल अतिजलद विशेष*  

04152 अतिजलद विशेष दि. ८.५.२०२१ ते ३१.७.२०२१ पर्यंत दर शनिवारी (१३ फे-या) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १७.१५ वाजता सुटेल आणि कानपूर सेंट्रल येथे दुसर्‍या दिवशी १५.२५ वाजता पोहोचेल. 
04151 अतिजलद विशेष दि. ७.५.२०२१ ते ३०.७.२०२१ पर्यंत दर शुक्रवारी (१३ फे-या) कानपूर येथून १५.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी १४.५५ वाजता पोहोचेल. 

 *थांबे* : भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, फतेहपूर. 

 *संरचना* : १ द्वितीय वातानुकूलित, ७ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ७ द्वितीय आसन श्रेणी. 

 *आरक्षण* :  पूर्णतः राखीव   04152 या अतिजलद विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. १.५.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.  

या अतिजलद विशेष ट्रेनचे तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपयाwww.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.  

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी देण्यात येईल.  
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. 
 























दिनांक: ३० एप्रिल २०२१  
प्रप क्रमांक 2021/04/85  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *