दोन जवान जखमी
मुंबई, दादासाहेब येंधे : भांडुप ड्रीम्स मॉलमध्ये भीषण आग लागून एक तेथील सनराइज् रुग्णालयातील ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर शनिवारी सकाळी प्रभादेवी येथे भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, आग विझवताना अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.
हरिश्चंद्र वडेकर हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. तर अभिजीत तांडेल यांना दादरच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रभादेवीत इलेक्ट्रिक वायरच्या गोडाऊनला आग लागली. ही आग लेव्हल-३ ची असल्याने चिंता होती. मात्र, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोडाऊनचा तळमजला आणि बेसमेंटमध्ये लागलेली आग शर्थीचे प्रयत्न करून विझवली. आगीत मालमत्तेचे मोठी हानी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा