Ticker

6/recent/ticker-posts

सायन उड्डाणपूल वाहतुकीस बंद

 मुंबई : सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. २७ मार्च ते २६ जूनपर्यंत आठवड्यातून तीन दिवस हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. यामध्ये दर शनिवारी रात्री १० वाजता ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत या पुलाचे काम केले जाणार आहे. इतर दिवशी मात्र हा पूल वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. दक्षिण मुंबईकडे जाऊ इच्छिणाऱ्या वाहनांनी येथे डावे वळण घेऊन वडाळा- आणिक रोड- भक्ती पार्क मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुलाब्याकडे जाता येईल. तसेच दादर, वरळी, भायखळा येथे जाऊ इच्छिणाऱ्या वाहनांना इथे डावे वळण घेऊन वडाळा-आणिक रोड- भक्ती पार्क मार्गे वडाळा चार रस्ता -पाच उद्यान मार्गाने प्रवास करता येणार आहे. यासाठी वाहतुकदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन माटुंगा वाहतूक पोलिसांनी केले आहे.

                                                                                              माटुंगा वाहतूक विभागातर्फे लावलेला बोर्ड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या