Ticker

6/recent/ticker-posts

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उपायुक्त रामदास कोकरे यांची मुलाखत

       मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात 'स्वच्छ  शहर, आनंदी शहर' या विषयावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्युज ऑन एअर या ॲपवरून शनिवार 20 सोमवार 22 फेब्रुवारी आणि मंगळवार 23 फेब्रुवारी रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका शिल्पा नातू यांनी ही मुलाखत घेतली आहे.

      कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्वच्छतेसाठी सुरू असलेले उपक्रम, प्लास्टिक निर्मुलनासाठी हाती घेतलेली मोहीम,स्वच्छ सर्वेक्षणासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न,‘पाच किलो प्लास्टिक द्या आणि पोळीभाजी मोफत घ्याही योजना, प्लास्टिकपासून इंधन निर्मीतीचा यशस्वी प्रयोग,प्रशासनात काम करताना आतापर्यंत स्वच्छतेसंदर्भातील राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम व त्यात स्थानिक लोकांचा असलेला सहभाग या विषयांची सविस्तर माहिती श्री. कोकरे यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या