Ticker

6/recent/ticker-posts

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जागतिक पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात जागतिक पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांची 'आधुनिक व दर्जेदार शिक्षण' या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 2021 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.


      ग्लोबल टीचर अवॅार्ड पुरस्कार मिळाल्यानंतरच्या भावना, या पुरस्कारासाठीचे निकष  व निवड पद्धती, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नेमका आयुष्यात झालेला बदल, जिल्हा परिषद शाळेत तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी केलेले शैक्षणिक प्रयोग, क्विक रिस्पॉन्स (क्यूआर) कोडचा शालेय शिक्षणासाठी वापर करण्याची कल्पना, स्काइप इन क्लासरूम हा उपक्रम, शिक्षणपद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा यासाठीच्या उपाययोजना आदी विषयांची माहिती श्री. डिसले यांनी जय महाराष्ट्र’  या कार्यक्रमातून दिली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या