केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राज्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी मुंबईत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत १५ हजार शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. सर्वाधिक शेतकरी हे नाशिकमधील असल्याचे यात सहभागी आंदोलकांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.


0 टिप्पण्या