मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकातील नवा पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत खुला करण्यात आला आहे. मालाड स्थानकाच्या दक्षिण दिशेला हा १० मीटरचा नवीन रुंद पादचारी पूल उभारला आहे. या पुलाकरिता चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. टाळेबंदीच्या काळात रेल्वेने पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यावर भर दिला. मालाड स्थानकातील जुना पादचारी पूल पाडल्यानंतर नवीन पूल उभारला आहे. त्याची लांबी ४९.५० मीटर आहे. प्लॅटफॉर्म १ ते ३ ला जोडला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना गरजेच्या वेळेस मोठा दिलासा मिळणार आहे.

0 टिप्पण्या