झाडांवर कुऱ्हाड
मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर रुंदीकरण व मेट्रोच्या लाईन साठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या ७०० हुन अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. या सर्व झाडांवर पालिकेच्या वृक्षप्राधिकरणाने नोटीस लावून नंबर टाकले आहेत. प्रस्तावानुसार ७२८ झाडावर सरळ कुऱ्हाड चालवली जाणार आहे. तर १२७ झाडे मुळापासून काढली जातील. ६१० झाडे उखडून पुनर्रोपित केली जाणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. याआधी मेट्रो कारसाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. त्या पाठोपाठ आता जोगेश्वरी -विक्रोळी रस्ता रुंदीकरण आणि मेट्रोमुळे ७०० हुन अधिक झाडांवर संक्रांत कोसळणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा