एकावेळी १ कोटी डोस साठवण्याची तयारी अंतिम टप्प्यात
मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्रात तीन कोटी लसीच्या कुप्या पाठवण्याची तयारी
चालवली असून एकट्या मुंबईत एका वेळी एक कोटी लसीचे डोस साठवता येतील इतकी क्षमता निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबईत कमी वेळेत अधिक लसीकरण करायचे असल्याने आठवडाभरात हे काम पूर्ण
होणार आहे, इतक्या प्रचंड प्रमाणात साठवणूक क्षमता असणारे
मुंबई हे पहिले शहर ठरणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी
दिली.
कूपर रुग्णालय, भाभा रुग्णालय,
शिव रुग्णालय, केईएम रुग्णालय,
नायर रुग्णालय येथे कोरोना लस साठवणूक केंद्रे तयार करण्यात आली असून एस विभागातील
कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पाच हजार चौरस फूट क्षेत्र
असलेली जागा ही प्रादेशिक साठवणूक केंद्र (आरव्हीएस) म्हणून तयार करण्यात आली आहे. अशीच अशाच प्रकारची आणखी चार साठवणूक केंद्रे नव्याने तयार करण्यात
येणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा