मुंबईतील शाळा बंदच राहणार - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

मुंबईतील शाळा बंदच राहणार

 सुचनेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

मुंबई : मुंबईतील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मात्र, अन्य देशांमध्ये आलेली कोरोनाची दुसरी लाट आणि अन्य राज्यांतील कोरोनाची परिस्थिती पाहता महापालिका आयुक्तांचे पुढील आदेश मिळेपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा अनिश्चित काळासाठी बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शाळा बंद ठेवण्याच्या सुचनेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी शिक्षण दिले आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज