देशभरातील लसीकरणाला मुंबईतून मोदींच्या हस्ते सुरुवात - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

देशभरातील लसीकरणाला मुंबईतून मोदींच्या हस्ते सुरुवात

आजपासून कोरोना लस

मुंबई, दादासाहेब येंधे : अवघे जग ज्या लशीची वाट पाहत होते ती घटका आज समीप आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडेदहा वाजता विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयातील दृकश्राव्य माध्यमातून या मोहिमेचे उदघाटन करतील.  

कोरोना प्रतिबंधासाठी मुंबईसह, ठाणे, पालघरमध्ये आजपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या 'कोविशील्ड' लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. 

लसीकरणासाठी मुंबईतील १९ तर ठाणे जिल्ह्यात २९ केंद्र सज्ज ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा मुंबईत शिरकाव झाल्यानंतर मागील १० महिन्यांपासून मुंबईकरांचा कोरोनाविरोधात लढा सुरू आहे. सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या लसीचा पहिला साठा बुधवारी मुंबईत दाखल झाला. त्यानुसार आजपासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. मुंबईत बुधवारपर्यंत १ लाख १९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी को-विन अँपवर लसीकरणासाठी आपले नाव नोंदवले आहे.

मुंबईत वांद्रे-बिकेसी कोविड सेंटर येथे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता लसीकरणाला सुरूवात होणार असल्याची माहिती बिकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे यांनी दिली. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज