मुंबई, दादासाहेब येंधे : धावत्या एक्सप्रेसमधून उतरण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन रेल्वे खाली पडणाऱ्या महिलेचे प्राण दोघा रेल्वे पोलिसांनी वाचवले. ही घटना शनिवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास ठाणे रेल्वेस्थानकावर घडली. धनपट्टी राजू भारद्वाज असे या महिलेचे नाव असून ती फलाट क्रमांक ५ वर आलेल्या महानगरी एक्सप्रेस गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी रेल्वे धीम्या गतीने पुढे जात होती. धावत्या रेल्वेतून उतरताना महिलेचा पाय घसरल्याने रेल्वेखाली सापडली त्यावेळी कर्तव्यावर असलेले रेल्वेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, सत्तार शेख फलाटावर गस्त घालत होते. हा प्रकार त्यांच्या निदर्शनास येताच दोघांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सदर महिलेकडे धाव घेतील. तिचा पाय खेचून तिला बाजूला घेत तिचा जीव वाचवला. महिलेचे पती राजू भारद्वाज यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.

0 टिप्पण्या