सीएसएमटी स्थानका बाहेर पट्टे विक्रीला
मुंबई : सामान्य प्रवाशांसाठी लोकलचा प्रवास अजूनही सुरू झालेला नाही. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच हा प्रवास सुरु असल्यामुळे खासगी सेवेतील प्रवासी विविध मार्गांनी लोकलमध्ये प्रवास मिळवत आहेत. रस्ते प्रवासात चार ते पाच तास प्रवासात जात असल्यामुळे कार्यालयात पोहोचण्यास उशीर होतो. यावर उपाय म्हणून खोटे आयडी कार्ड, मेडिकल सर्टिफिकेट घेणाऱ्यांचे प्रमाण सध्या वाढत आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर काही विक्रेत्यांकडे आयडी कार्ड साठी लागणाऱ्या मुंबई महापालिका, महाराष्ट्र सरकार, सेंटर रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट असे लिहिलेल्या पट्ट्यांची अनधिकृत विक्री सुरू आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या लोकल प्रवास करायला मुभा असलेले कर्मचारी गळ्यात आयडी कार्ड घालून फिरत आहेत, त्यामुळे प्रवाशांमध्ये होणारी अडवणूक टळते. दुसरीकडे लोकल प्रवास करणे शक्य व्हावे म्हणून खोटे आयडी कार्ड बनवून घेतली जात आहेत. त्या जोडीला आता असे पट्टेही उपलब्ध होत असल्याने कोणी आपल्याला अडवणार नाही या खात्रीनेच या पट्ट्यांची खरेदी होत आहे. याकडे रेल्वे पोलिसांनी, टीसी लक्ष द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा