Ticker

6/recent/ticker-posts

पोलिसांसाठी स्कॉड बाईक

मुंबई पोलिसांसाठी ५०० सीसी स्पोर्टसमन स्कॉड बाईक

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई पोलीस दलात नववर्षाच्या सुरुवातीला अत्याधुनिक सायकल दाखल झाली असून प्रायोगिक तत्त्वावर सध्या दोन सायकली विनोबा भावे नगर पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या सायकली वायफाय, ब्लुटूथने सज्ज असून त्या ३५ किलोमीटर पर्यंत बॅटरीवर चालणार आहेत. 

या सायकली पोलीस दलात दाखल होतात ना होतात तोच नवनीत ग्रुप मोटर च्या वतीने मुंबई पोलिसांसाठी ५०० सीसी स्पोर्टसमन स्कॉड बाईक व रेंजर ९०० सीसी बाईकचे प्रात्यक्षिक गिरगाव चौपाटी येथे आयोजित केले होते. या बाईक देखील येत्या काळात मुंबई पोलीस दलात सामील होतील असे सांगण्यात येत आहे. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या