मोकाट श्वानांना पकडण्यासाठी पालिकेच्या गाड्यांची गस्त
मुंबई, दादासाहेब येंधे :
मुंबईतील भटक्या श्वानांची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. या भटक्या मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्या निर्बीजिकरणासाठी मुंबईतील २४ विभागांत 'डॉग व्हॅन' ची व्यवस्था केली जाणार आहे.
मुंबईतील रस्त्यांवरील मोकाट कुत्र्यांमुळे मुंबईकर मेटाकुटीला आले आहेत. रात्री-अपरात्री येणाऱ्या-जाणाऱ्या पाडचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या मोकाट श्वानांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिकेने मोकाट श्वानांची समस्या संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

0 टिप्पण्या