Ticker

6/recent/ticker-posts

उर्मिला मातोंडकर यांनी बांधले शिवबंधन

मुंबई, दादासाहेब येंधे : प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी 'मातोश्री' येथे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला यांनी प्रथमच जाहीर पत्रकार परिषद घेत पक्ष प्रवेशाच्या निर्णयाबाबत खुलासा केला. 'मी चित्रपटसृष्टीत २९-३० वर्षांपूर्वी माझी कारकीर्द सुरू केली, तेव्हा मराठमोळ्या घरातून आलेली मुलगी होते. चित्रपटसृष्टीत असताना लोकांनीच मला स्टार केले. त्यानुसार मी माझ्या राजकीय आणि उर्वरित आयुष्यात लोकांनी बनवलेली लीडर होणे पसंत करेन', असे उर्मिला म्हणाल्या.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या