मुंबई, दादासाहेब येंधे : वाढदिवस म्हणजे फिरायला जाणे, केक कापणे, मित्रमैत्रिणींसोबत पार्ट्या करणे, मौजमजा करणे. पण, काहीजण याला अपवाद असतात. मुंबईचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांची कन्या वेदांगी बोरीकर हिने आपला वाढदिवस अशाच वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केला. आपल्या वाढदिवसानिमित्त तिने रविवारी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'कोयना' या नऊ वर्षांच्या दृष्टिहीन मादी बिबट्यास दत्तक घेत समाजाप्रती व वन्यजीवांप्रती आपली जबाबदारी दाखवत एक वेगळा पायंडा घालून दिला.

0 टिप्पण्या