Ticker

6/recent/ticker-posts

वाहन चोरी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

एम एच बी.कॉलनी पोलीस ठाणेची धाडसी कारवाई 

डुप्लीकेट चावीचा वापर करून मोटरसायकल चोरी

-दादासाहेब येंधे : 
हरेश किसन पाटील,वय- 24 वर्ष, धंदा:- नोकरी, राठी:- इंदिरानगर, जयवंत सावंत रोड, हॅपी होम सोसायटी समोर, दहिसर, पश्चिम मुंबई.

यांच्या घराजवळ रोडवर दिनांक ०८ सप्टेंबर २० रोजी रात्रो २१.३० वाजता चे सुमारास जयवंत सावंत रोड, दहिसर पश्चिम मुंबई या ठिकाणी मोटरसायकल (डिओ) क्र. MH 47 AK 3990 ही पार्क केली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली याबाबत पोलीस ठाणे येथे येऊन दिनांक १० सप्टेंबर २० रोजी रितसर तक्रार दिली होती.

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे  पो.ह. कोकीतकर व पथक हे आज रोजी दहिसर पश्चिम नदी किनारा परिसरात गस्त करित असतांना एक इसम मोटर सायकल घेऊन फिरताना दिसुन आला सदर इसमाला गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने पकडून सदर इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या जवळ असलेली मोटरसायकल डिओ ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने इसम नामे तेज मानविर सारकी वय २१ वर्ष,धंदा-नाही रा.ठी.रिचर्ड चाळ,रु.नं.०३, साईबाबा मंदिरा जवळ,नवागाव, दहिसर पश्चिम मुंबई यास पोलीस ठाणे येथे आणून आज रोजी ०२/१२/२०२० रोजी १९:४० वा नमुद गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे व गुन्हातिल चोरीस गेलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. अशी माहिती एम.एच.बी.कॉ. पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी दिली आहे. 

गुन्हा नोंद क्रमांक  642/2020
कलम 379 भा द वि,




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या