सेनेचा 'लालबाग-परळ' ब्रँड हरपला
मुंबई, दादासाहेब येंधे : शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी शनिवारी सकाळी गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रावले हे शिवसेनेच्या तिकिटावर दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या रावले यांची सर्वसामान्यांचे नेते आणि 'लालबाग-परळ ब्रँड' अशी ही ओळख होती.
क्रिकेटची आवड असणारे मोहन रावले क्रिकेटमध्ये करियर करू पाहणाऱ्यांना नेहमी प्रोत्साहन द्यायचे. ते क्रिकेटचे सामने भरवायचे. लालबाग-परळ मध्ये शिवसेना रुजविण्याच्या कामात त्यांचा मोलाचा सहभाग होता. शिवसेनेतील बडया नेत्यांपासून ते शिवसैनिकांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचा दांडगा संपर्क होता. खंदा कार्यकर्ता गेल्यामुळे शनिवारी दिवसभर शिवसेनेत शोककळा पहावयास मिळाली.

0 टिप्पण्या