Ticker

6/recent/ticker-posts

खेरवाडी पोलिसांकडून मोबाईल चोरांना अटक

 मोबाईल, वाहने, चोरणारी टोळी अटकेत

मुंबई, दादासाहेब येंधे : दुचाकीसह रिक्षा तसेच मोबाईल चोरणाऱ्या टोळीला खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे अनेक मोबाईल, ९ दुचाकी व दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. वांद्रे पूर्व, कलानगर म्हाडा कार्यालयासमोर यातील फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल फोन बजाज पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांत तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. घटनास्थळी प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी साजीद अन्सारी उर्फ शोहेब व नावेद नदीम शेख या दोघांना या गुन्ह्यात अटक केली. तसेच आरोपींकडून मोबाईल फोन विकत घेणारा अब्दुल्ला सलीम खान यालाही पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील अनेक मोबाईल हस्तगत केले आहेत. अटक आरोपींकडे सातत्याने तपास करून या गुन्ह्यातील त्यांचे अन्य साथीदार मुदस्सीर खान ऊर्फ चिंटू मोईन शेख उर्फ एस के मतीन शेख उर्फ पापा व रिजवान शेख उर्फ बेचू यांनाही अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींच्या एकत्रित तपासात खेरवाडी, वाकोला, वांद्रे, नेहरूनगर, कुर्ला, धारावी, चेंबूर व अन्य पोलिस ठाण्यात अनेक चोऱ्या, दुचाकी वाहन, ऑटोरिक्षा चोरीच्या गुन्ह्यांची उकल झालेली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून पोलिस आणखी तपास करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या