Ticker

6/recent/ticker-posts

गर्दी होणाऱ्या ठिकाणी महापालिकेकडून कोविड टेस्टिंग

फेरीवाल्यांचीही कोविड चाचणी

मुंबई, दादासाहेब येंधे : सार्वजनिक ठिकाणी आणि बहुतेक करून बाजार असलेल्या ठिकाणी कोरोना वाढण्याचा संसर्ग अधिक असल्यामुळे फेरीवाले, दुकानदार व मंडईमधील गाळेधारकांचीही कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दादर, जोगेश्वरी, बोरिवली आदी ठिकाणी चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने खबरदारी घेतली आहे. 

मुंबईतील विविध बाजार मंडयांमध्ये मोठी गर्दी होत असल्याने तेथे सुरक्षित अंतराचा फज्जा उडतो. त्यामुळे सर्व विभागांत कोविडच्या मोफत चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेमुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात यश येत असून चाचण्यांचे प्रमाण वस्त्या तसेच फेरीवाल्यांसह गर्दीच्या ठिकाणीही वाढविण्यात आले आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या