प्रथम लस भारतीयांना
'सीरम इन्स्टिट्यूट' आणि 'एस्ट्राझेनेका' कंपनीच्या 'कोव्हीशिल्ड' लशीच्या आपत्कालीन वापरासाठी येत्या दोन आठवड्यांत परवान्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. ही लस सर्वप्रथम भारतातच उपलब्ध होईल, असे सीरम' कंपनीने शनिवारी जाहीर केले. ही लस घेतल्यानंतर रुग्णालयात जाण्याची गरज शून्य टक्क्यांवर येईल आणि विषाणूची तीव्रता ६० टक्क्यांपेक्षा कमी होईल, असे इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी स्पष्ट केले.
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोविड प्रतिबंधक लसीची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील 'सीरम' इन्स्टिट्यूटला शनिवारी भेट देऊन लसीच्या उत्पादनापासून ते वितरणापर्यंतच्या विविध मुद्दयांबाबत त्यांनी डॉ. सायरस पुनावाला आणि आदर पुनावाला यांच्यासह इतर शास्त्र द्यंशी चर्चा केली.
त्यानंतर मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत आदर पुनावाला यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

0 टिप्पण्या