मुख्यमंत्र्यांनी केली कोस्टल रोडची पाहणी
मुंबई, दादासाहेब येंधे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी नेपियन्सी रोड, महालक्ष्मी व वरळी येथे कामाची पाहणी केली. या प्रकल्पासाठी मोठमोठे बोगदे खोदावे लागणार आहेत. 'मावळा' नावाचे अजस्त्र यंत्र या बोगद्यांचे खोदकाम करण्यासाठी आणण्यात आले आहे.

0 टिप्पण्या