Ticker

6/recent/ticker-posts

काळाचौकी पोलीस ठाणेचे वपोनि यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

जीवन प्रबोधिनी ट्रस्टतर्फे कोरोना योद्धा पुरस्कार

काळाचौकी पोलीस ठाणे यांची उत्कृष्ट कामगिरी

मुंबई, दादासाहेब येंधे: लॉकडाऊन पासून ते आज मितीपर्यंत म्हणजेच अनलॉक ५ पर्यंत  मुंबईत कोरोनाचा प्राद्रर्वभाव रोखण्यात  डॉक्टरांनंतर अहोरात्र जर कोणी मेहनत घेतली असेल तर ती मुंबई पोलिसांनी, 'घरी रहा, सुरक्षित रहा' हे जनतेला दिवसरात्र वायरलेस गाडीवरून सांगत, अपुरा पोलीस कर्मचारीवर्ग  असतानाही त्यांनी आपले काम चोख बजावले.

मूर्ती बनविणारे मूर्तिकार, मोठमोठी गणपती उस्तव मंडळं, नवरात्र उत्सव मंडळ आदी काळाचौकी पोलीस ठाणेच्या हद्दीत येत असून ह्या सर्वांना वेळोवेळी सरकारच्या गाईडलाइन प्रमाणे  त्या सर्व मंडळांची पोलिस ठाणेत बैठका घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याची मार्गदर्शक तत्वे सांगितली. 

तसेच जे परप्रांतीय मजूर, ट्रक चालक हे लॉकडाउन मध्ये मुंबईतील कॉटनग्रीन येथे अडकून पडले होते त्यांना  रोज जेवणाची सोय ही काळाचौकी पोलीस चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंह पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून  आज  जीवन प्रबोधिनी ट्रस्ट च्या  वतीने त्यांना शाल श्रीफळ आणि कोरोना योद्धाचे प्रमाणपत्र देऊन श्री. गोकुळसिह पाटील( वरिष्ठ पोलीस निरीक्षक) आणि त्यांचे सहकारी  यांचा सत्कार करून गौरविण्यात आला. प्रसंगी ट्रस्टचे संस्थापक श्री सत्यवान नर,  अध्यक्ष अमित पवार, सदस्य अविनाश पवार, आणि सिद्धेश पांगम हे उपस्थित होते. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या