लॉक डाउनचे आता नावही नको - उपमुख्यमंत्री, अजित पवार
मुंबई, दादासाहेब येंधे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात पुन्हा लॉकडाउन करण्यास विरोध दर्शविला आहे. लॉक 'डाऊनचे नावही नको', अशा शब्दांत पवार यांनी आपली भूमिका मांडली.
अजित पवार म्हणाले, 'नऊ महिन्यांपासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. रोज काम केले, तरच ज्यांचे घर चालते अशांना लॉकडाउन फटका बसतो. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर केला, तेव्हापासून हा सर्व समाज निमूटपणे आदेश पाळत आला आहे. कोरोना वाढू नये याची काळजी आपण सर्वजण घेऊयात'.

0 टिप्पण्या