Ticker

6/recent/ticker-posts

२६/११ च्या शहीद जवानांना श्रध्दांजली !!

सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे २६/११ ला शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

मुंबई,दादासाहेब येंधे : २६/११/२००८ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी सायंकाळचे सुमारास सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथे व मुंबई शहरात केलेल्या भ्याड हल्ल्यात, सीएसएमटी  रेल्वे पोलीस ठाण्याचे तत्कालीन  पोलीस निरीक्षक कै. शशांक शिंदे हे ऑन ड्युटी असताना शहीद झाले होते.

त्यांचे फोटोस पुष्पचक्र व श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आज सकाळी ठीक १०.३० वाजता पोलीस ठाणे समोरील आवारात पार पडला.

यावेळी मा. पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई, सहाय्यक पोलीस आयुक्त, सीएसएमटी विभाग, लोहमार्ग, मुंबई, पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे, ०३ पोलीस उप निरीक्षक व ४५ पोलीस अंमलदार तसेच मुख्यालय घाटकोपर येथील बँड पथक असे हजर होते. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.आर.पाल यांनी दिली आहे.

                  












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या