Ticker

6/recent/ticker-posts

गर्दी टाळा, वेळीच सावध व्हा!

 धोका ओळखा, सावध व्हा

मुंबई, दादासाहेब येंधे : पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने जायचे नसेल तर वेळीच सावध व्हा असे स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री उद्धव उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला खबरदारीचा इशारा रविवारी दिला. कोरोनाची लस अजून अधांतरीच असल्याने उगाच विषयाशी परीक्षा घेऊ नका. गर्दी टाळणे, मास्क वापरणे आणि हात धूत राहणे हीच त्रिसूत्री आपल्यासाठी तारणहार असून ती पाळावीच लागेल, असे आवाहनही त्यांनी केले. हे उघडा, ते उघडा म्हणणारे राज्यातील जबाबदारी घेणार आहेत का? असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. 

दिवाळीनंतर कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून राज्यात अद्याप कोरोनाची दुसरी लाट आलेली नसली तरी दिल्ली, अहमदाबाद आणि सुरत यासारख्या मोठ्या शहरात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले असून आरोग्य यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज होताना दुसरी लाट आली तर ती परतवण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अन्य विषय टाळून केवळ कोरोनाला केंद्रस्थानी ठेवत जनतेला आवाहन केले.

कोरोनाचे आकडे जरी कमी झाले असले तरी ते पुन्हा वाढू द्यायचे नाहीत. देशातील काही शहरांत रात्रीचा कर्फ्यू लावण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. मलाही काहीजण सुचवत आहेत. मात्र, आपल्याला काही करायचे नाही. लॉकडाऊनही आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र पुढे न्यायचं असेल तर तुमची साथ महत्वाची आहे. कृपा करून गर्दी टाळा. तुमच्या मागणीनुसार प्रार्थनास्थळे उघडण्यात आली असली तरी तेथे गर्दी करू नका. जे नियम ठरवले आहेत, ते पाळा. उगाच विषाची परीक्षा घेऊ नका. गर्दी झाली तर कोरोना मरणार नाही. तो वाढणार आहे, हे पक्के ध्यानात असू द्या अशी कळकळीची विनंती आणि आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या