Ticker

6/recent/ticker-posts

शाळा विचारपूर्वक सुरू करा

शाळेचा निर्णय विचारपूर्वक घ्या

मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. मात्र,  इयत्ता नववी, दहावीच्या शाळा आणि अकरावी व बारावी कॉलेज सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 

राज्यात शाळा व कॉलेज सुरू करण्याबाबत राज्य सरकार गोंधळलेल्या स्थितीत दिसत आहे. दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा असे सरकारचे आदेश आहेत; पण कोरोनाबाबत परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतला जावा विद्यार्थी, शिक्षक यांचा विचार प्राधान्याने करावा, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या