Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना योद्ध्यांचा सत्कार

 जीवन प्रबोधिनी ट्रस्टतर्फे अविरत वैद्यकीय सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतील बा. य.ल. नायर रुग्णालयाने कोविड रुग्णालय म्हणून कोरोना काळात मुंबईतील नागरिकांसाठी अहोरात्र वैद्यकीय सेवा बजावली.

नायर रुग्णालयातील  अधिष्ठाता व मुंबई  महापालिकेचे आरोग्य संचालक डॉ. रमेश भारमल,  अधीक्षक डॉ. शैलेश मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका पाटील यांच्या उपस्थितीत  अधिसेविका ऋचा साळगावकर, अधिपरिसेविका नेहा सोनसुरकर,  रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. नितीन वाळवी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी कल्पना शिंदे,  कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी उमेश शिंदे, श्री नरेश नाईक, श्री नरेश कामत श्री दिनेश पाटकर, श्री कपिल कामत, श्री रवींद्र पवार, श्री यशोधन देशपांडे या सर्वांनी कोरोनाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत  निरपेक्ष भावनेने आपली सेवा बजावली, याचा च एक भाग म्हणून  जीवन प्रबिधिनी ट्रस्ट तर्फे  या सेवा देणाऱ्या  योद्धयांचा  सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी जीवन प्रबोधिनी ट्रस्ट या सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या संस्थेचे संस्थापक सत्यवान नर, अध्यक्ष अमित पवार, सरचिटणीस हेमंत मकवाना, खजिनदार श्रेयस घाटकर, विनायक येंधे, रवी जाधव, वैश्य समाजाचे सरचिटणिस स्वप्नील बोभाटे, आदी मान्यवर उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या