Ticker

6/recent/ticker-posts

संयमाचे बक्षीस, गृहमंत्र्यांकडून सत्कार

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पार्टे यांचा सत्कार
मुंबई, दादासाहेब येंधे : वाहतुकीचे नियम मोडून वाहतुक पोलीस हवालदार एकनाथ पार्टे यांना मारहाण करणारी व्यक्ती महिला असल्याने पार्टे यांनी संयम राखला. अपशब्द काढणाऱ्या महिलेसमोर कुठेही संयम ढळू देता आपले कर्तव्य बजावणाऱ्या पार्टे यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा नुकताच सत्कार केला.


हा सत्कार करतानाच पोलिसही माणूस असतो, त्यांच्याही भावनांचा सन्मान करा, असे आवाहन गृहमंत्र्यांनी नागरिकांना केले. तसेच मारहाण करणाऱ्या महिलेचा त्यांनी निषेधही केला. ते म्हणाले, मुंबई पोलीस दलातील वाहतुक शाखेचे हवालदार पार्टे यांना कर्त्यव्यावर असताना मारहाण झाली, ही बाब निषेधार्ह आहे. पार्टे यांनी संयम धैर्याने परिस्थिती हाताळली. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या