राज ठाकरेंनी घेतली विविध मागण्यांसाठी राज्यपालांची भेट
मुंबई, दादासाहेब येंधे : लॉक डाऊनच्या काळात नागरिकांचे रोजगार गेले, पैसे येणे बंद झाले. मात्र, वीज बिले भरमसाट आली आहेत. ती तात्काळ कमी करण्यात यावी. राज्यात प्रश्नच प्रश्न आहेत, पण निर्णय होत नाही. सगळे कुंथत-कुंथत सुरू आहे. ही धरसोड वृत्ती का आहे, हे कळतच नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांनी वीज बिल। कमी करण्यात यावे, तसेच शेतकऱ्याला
दुधाला २७ ते २८ रुपये भाव मिळाला, अशी मागणी केली. वीज बिलप्रश्नी आपण राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , तसेच मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.
वीज बिल कमी व्हावे या मागणीसाठी राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी नेतेही उपस्थित होते.
0 टिप्पण्या