Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई पोलिसांना हायकोर्टाकडून शाबासकी

 मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड पोलिसांशी

मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाच्या संकटात कामाचा व्याप असतानाही त्यावर मात करत मुंबई पोलिसांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. मुंबई पोलीस उत्तम काम करत आहेत. जगभरात त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले जात आहे. मुंबईकरांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे, अशा शब्दांत नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या कामाची प्रशंसा केली. 

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाणे गुरूवारी (२९ ऑक्टोबर२०२०) मुंबई पोलिसांनी कठीण काळातही आपले कर्तव्य चोख बजावले असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांची जगभरात वाहवा होत असून मुंबई पोलीस हे जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी एक आहेत असं मत नोंदवलं.

माननीय न्यायमूर्ती शिंदे म्हणाले की, कोरोनासारख्या महामारीच्या काळात पोलीस दलाची ड्युटी खूप कठीण होती. ते आधीच खूप तणावात आहेत. त्यांना बारा-बारा तासांची ड्युटी करावी लागत असतानाही ते संयमी आहेत. विविध सणांचे बंदोबस्त नेहमीचेच. अशा विपरीत परिस्थितीतही मुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानले जाते. त्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते. त्यामुळे मुंबकरांनीही त्यांना सहकार्य केले पाहिजे असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या