Ticker

6/recent/ticker-posts

मधल्या बस स्टॉपवरील प्रवाशांचे हाल

डेपोतच गर्दी; मधल्या बस स्टॉपवरील प्रवाशांचे हाल


मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनामुळे लोकल बंद असल्याने बेस्ट बसवरच नोकरदारांचा प्रवास अवलंबून आहे. बऱ्याचशा बस या डेपो मध्येच भरत असल्यामुळे मधल्या थांब्यांवरील प्रवाशांना तब्बल एक ते दीड तास तोंडाला मास्क लावलेल्या अवस्थेत रस्त्यावर बसची वाट पाहावी लागते. त्यामुळे प्रवाशांचा बसच्या रांगेतच जीव गुदमरत आहे.
मुंबईत सध्या ३ हजाराच्या आसपास बस रस्त्यावर धावत असूनही रोजच बस स्टॉपवर बस पकडण्यासाठी मुंबईकरांची कसरत दिसून येत आहे.

सध्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार २५ प्रवाशांना बसून आणि पाच प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे बस डेपोमध्येच भरून जात आहेत. बस क्षमतेनुसार भरल्यानंतर मधल्या थांब्यांवर थांबवली जात नाही. त्यामुळे येथील प्रवाशांची चांगलीच कोंडी होत आहे. मुंबई विद्यापीठ  ते गोरेगाव, दहिसरपर्यंतच्या प्रवासाला सध्या वाहतूक कमी असल्याने दीड ते दोन तास लागतात. मात्र, त्यासाठी एक ते दीड तास बसची प्रतीक्षा करत थांबावे लागते.

लोकल सेवा सुरू होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. प्रतीक्षा करण्यातच जास्त वेळ जातो. आगारातच बस पूर्ण भरत असल्याने मधल्या बस स्टॉपवरील प्रवाशांना बस मिळतच नाही.

भायंदर येथून चर्चगेटला येणारे दिलीप  शुक्ला हे सकाळी ७.३० वाजता घर सोडतात तेव्हा कुठे ते १०.०० वाजता ऑफिसला पोहोचतात.  तर आम्ही रोज एक-एक तास लालबाग, जयहिंद टॉकीज बस स्टॉपवर उभे असतो. बऱ्याच बस येतात. पण, बेस्ट वाहक बस थांबवतच नाहीत असे लालबाग, काळाचौकी येथे राहणाऱ्या काही प्रवाशांनी सांगितले.




                                                  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या