कोपरखैरणे पोलीस ठाणे यांनी अवघ्या ३ तासांत
आरोपींच्या मुसक्या आवळल्या
नवी मुंबई, दादासाहेब येंधे : कोपरखैरणे आकाशगंगा को ऑप हौसिंग सोसायटी, प्लॉट कमांक १५, से.कं. २३, कोपरखैरणे, नवी मुंबईच्या गेटसमोर अर्टिगा गाडी पार्क केलेल्या इसमाला गाडी बाजुला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून त्याने आकाशगंगा को ऑप
हौसिंग सोसायटीच्या सभासदाना शिवीगाळ व दमदाटी करून तेथुन जावुन पुन्हा त्याचे अनोळखी साथीदारसह मोटार सायकलवरून सोसायटीच्या गेटसमोर व आवारात येवुन सोसायटीच्या कार्यरणीतील सभासदाना शिवीगाळ करून दुस-या अनोळखी इसमाने त्याचेजवळील पिस्तुलाचा धाक दाखवुन, 'टकल्या किधर है, एक एकको ठोक देता हूं' अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
त्याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाणे गु.रजि नं ह १७२/ २०२० भादंवि सं कलम ५०४,५०६,३४ सह आर्म अक्ट कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)१३५ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
सदर गुन्हा घडल्यानंतर त्वरीत त्या ठिकाणी, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाशी विभाग, नवी मुंबई श्री. विनायक वस्त, वपोनि सुर्यकांत जगदाळे, पोउपनि सम्राट वाघ, पोउपनि शिवाजी पोफळे व
गुन्हे प्रकटरण पथकांतील अंमलदार यांनी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली होती. वरिष्ठांच्या मार्गदशनानुसार त्वरीत पोउपनिरी सम्राट वाघ यांचे पथके तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवुन
तपास सुरू करण्यात आला.
सदर पथकांनी तात्काळ गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन अथक परिश्रम घेवुन गुन्हयाचा अभ्यास, साक्षीदारांची चौकशी व सीसीटीव्ही फुटेजचा अवलोकन करून गुन्हयात आरोपीने वापरलेल्या जावा
मोटार सायकलच्या मेकवरून आरोपींपर्यंत पोहचुन दोन्ही आरोपींच्या अवघ्या ०३ तासांत मुसक्या आवळल्या.
अटक आरोपींचे नावे खालील प्रमाणे
१) अकलेश अशोक गुप्ता, वय २८ वर्षे, धंदा नोकरी, रा. रो हाऊस नं. १०४, से.कं. ५, मनमोहन
मिठाईवालाजवळ, घणसोली, नवी मुंबई.
२) राजु निखिल मंडल, वय १९ वर्षे, धंदा नोकरी, रा. साई आपर्टमेंट, रूम नं. ४०६, महानगर
पालिका ऑफिससमोर, घणसोली गाव, नवी मुंबई.
सदर आरोपींनी सदर गुन्हयाची कबुली दिलेली असुन त्यांचेकडून गुन्हयात वापरलेली पिस्तुल व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल वर्णन खालील प्रमाणे.
१) रू. ९,५०,०००/-- किंमतीची जाव मोटार सायकल कमांक MH_43-BT-9141 .
२) रू. ०९,०००/-- किंमतीचे खेळण्यातील पिस्तुल.
कोपरखैरणे पोलीस ठाणेच्या पथकाने अथक परिश्रम घेवुन आकाशगंगा को ऑप हौसिंग सोसायटीच्या सदस्याना शिवीगाळ करून शस्त्राचा धाक दाखविणा-या दोन्ही आरोपींना ३ तासांत
ताब्यात घेवुन उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
सदर गुन्हयाचे तपासकामी मा. पोलीस आयुक्त श्री संजय कुमार साहेब., मा. सह पोलीस आयुक्त श्री. व्हटकर साहेब, मा. पोलीस उप आयुक्त परि-१ वाशी, नवी मुंबई, श्री पंकज डहाणे साहेब, मा. सहा. पोलीस आयुक्त, वाशी विभाग, नवी मुंबई श्री. विनायक वस्त यांचे वपोनि श्री. सुर्यकांत जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी श्री. सम्राट वाघ, पोहवा/प्रकाश देशमुख, 'पोशि/गणेश गिते, पोशि/किरण बुधवंत यांनी अतिशय परिश्रम घेवुन ३ तासांत गुन्हा उघडकीस आणण्याची उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.



0 टिप्पण्या