Ticker

6/recent/ticker-posts

कंदिवलीत डोंगराचा भाग कोसळला

मुंबईत कांदिवली येथे दरड कोसळली



मुंबई, दादासाहेब येंधे : रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे संपूर्ण मुंबई जलमय झाल्याची चित्र समोर येत आहेत. तर कंदिवलीत डोंगराचा काही भाग कोसळल्यामुळे मिरा रोडहून मुंबईकडे येणारा पश्चिम द्रुतगती मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. वाहतूककोंडी झाल्यामुळे वाहतूक इतर मार्गांवरून वळवण्यात आली आहे.

दरड कोसळल्यानंतर मोठमोठे दगड रस्त्यावर पडले आहेत. काही नागरिकांनी गाड्या सोडून तेथून पळ काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. या घटनेत अजूनपर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सध्या ही दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, ते कामसुद्धा सावधगिरीनं करावं लागतंय. कारण ही माती ओली आहे. माती सैलसर झाली आहे. त्यामुळे येथील डोंगराचा काही भाग आणखीणही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यंत सावधगिरीने याठिकाणी दरड हटवावी लागत आहे.

मुसळधार पावसामुळे व ठिकठिकाणी कोंडी झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना बाहेर न पडण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या