सर्वांना सहज शिक्षण मिळावे या उद्देशाने शालेय आणि उच्च शिक्षणात व्यापक व दूरगामी असे परिवर्तन करणार्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात हा निर्णय घेण्यात आला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.
२१ व्या शतकातील हे पहिले शैक्षणिक धोरण असून ते सन 1986 मध्ये आखण्यात आलेल्या शैक्षणिक धोरणाची जागा घेणार आहे. गेल्या ३४ वर्षापासून शैक्षणिक धोरणात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. सर्वांना सहज शिक्षण, समानता, गुणवत्ता आणि उत्तरदायित्वाच्या पायाभूत स्तंभांवर आधारित नवे शैक्षणिक धोरण निरंतर विकासाच्या सन २०३० संरक्षणासाठी अनुकूल असल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे. २१ व्या शतकातील गरजांनुसार शाळा आणि महाविद्यालयांच्या शिक्षण समग्र आणि अधिक लवचिक करून ज्ञानावर आधारित समाज आणि ज्ञानाचा जागतिक महाशक्ती मध्ये भारताचे रूपांतर करण्याचा आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अंतर्भूत असलेल्या अद्वितीय क्षमतांना समोर आणण्यात या धोरणाचा उद्देश आहे. नव्या शैक्षणिक धोरणानंतर जगभरातील बडया विद्यापीठांना भारतात पदार्पण करणे सहज शक्य होणार आहे.
शालेय अभ्यासक्रमाची दहावी आणि बारावीची रचना बदलून आता ५+३+३+४ ची नवी अभ्यासरचना लागू करण्याचा अत्यंत महत्त्वाचा व दूरगामी परिणाम करणारा निर्णय केंद्राने घेतला आहे. या धोरणाची घोषणा बुधवारी करण्यात आली. ही रचना क्रमशः ३ ते ८, ८ते११, ११ते१४ आणि १४ते १८ या वयोगटातील मुलांसाठी आहे. त्यात आतापर्यंत शाळेपासून दुरावलेल्या ३ ते ६ वर्षांच्या मुलांना शालेय अभ्यासक्रमांतर्गत सामील करण्याचीही तरतूद आहे.
- शाळेच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये पूर्व प्राथमिक शाळेच्या तीन वर्षांत पहिली आणि दुसरीचा समावेश
- पुढील तीन वर्षांचा तिसरी ते पाचवीच्या टप्प्यात समावेश
- त्यानंतर तीन वर्षे सहावी ते आठवी अशा मध्य टप्प्यात
- चार वर्षे नववी ते बारावी अशा माध्यमिक टप्प्यात शिक्षण.
तीन वर्षे पूर्व प्राथमिक ते इयत्ता दुसरीपर्यंत
मेंदूचा विकास खेळ आणि कल्पकतेला वाव
इयत्ता तिसरी ते पाचवी
हसत खेळत कल्पक शिक्षण, साचेबद्ध शिक्षणाच्या दिशेने वाटचाल.
इयत्ता सहावी ते आठवी
विषयांतील संकल्पनांचा समावेश
पौगंडावस्थेतील आवश्यक मार्गदर्शन आणि घडण
इयत्ता नववी ते बारावी
उदरनिर्वाह व उच्च शिक्षणासाठी तयारी
कुमारवयाकडे वाटचाल
इयत्ता ११ वी व १२ वी
माध्यमिक शालेय शिक्षणाचा अविभाज्य भाग
0 टिप्पण्या