मुंबई, दादासाहेब येंधे : दहिसर चेकनाका परिसरात विनापरवाना देशी बनवटीचे पिस्तूल व सहा काडतुसांसह संदीप रमाशंकर उपाध्याय (३८) याला दहिसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ४९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा कुरार व्हिलेज, मालाड पूर्व परिसरात राहत असून त्याचा फेब्रिकेशनचा व्यवसाय असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक इंद्रजित पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून दहिसर चेकनाका परिसरात एक व्यक्ती देशी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दहिसर पूर्वकडील महानगर गॅस पंपासमोर दक्षिण वाहिनीवर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

0 टिप्पण्या