मुंबई, दादासाहेब येंधे : कफ परेड येथील आर्मी कॅम्पस मध्ये राहणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या बंद घरातील साडेसोळा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या महिलेला कफ परेड पोलिसांनी चोरीच्या मुद्देमालासह अटक केली आहे. सपना संजय सिंह (वय, वर्षे ३७) असे सराईत महिलेचे नाव असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी सविता राजीव द्विवेदी या आर्मी कॅम्पस कफ परेड, मुंबई येथे कुटुंबासह राहत असून त्या जानेवारी महिन्यात त्यांच्या कुटुंबासहित दोन महिन्यांकरीता बाहेर फिरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या घरात असलेल्या कपाटातील १६ लाख ६४ हजार रुपये किमतीचे एकूण १६ तोळे सहा ग्रॅम सोन्याचे दागिने, परकीय चलन व भारतीय रोख रक्कम चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. गुन्हे प्रकटीकरण पथकाने सलग पाच दिवस ३५ फुटेज, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी महिला सपना हिला चोरी केलेल्या मुद्देमालासह सात महिन्यानंतर अटक केली आहे.

0 टिप्पण्या