Ticker

6/recent/ticker-posts

रंगारी बदक चाळीत यंदा खंडेरायाचा जयघोष

मुंबई, दादासाहेब येंधे : रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ८७ वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करीत आहे.

धार्मिक पुराण कथांवर आधारीत चलचित्र देखावा सादर करणारे हे नामांकित उत्सव मंडळ आहे.  कला, क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक असे विविध उपक्रम मंडळाच्या वतीने राबविण्यात येतात. 


मुलांसाठी विविध स्पर्धा, महिलांसाठी हळदीकुंकू आणि विविध स्पर्धांचे देखील दरवर्षी आयोजन करण्यात येत असते. 



यंदा ८७ वा गणेशोत्सव श्री. मंगेश पिंपरकर- अध्यक्ष, श्री. रोहन सावंत - कार्याध्यक्ष, श्री. राकेश जेजुरकर - सरचिटणीस, शंकर साळवी, खजिनदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून यावर्षी खंडेरायाचा देखावा विशेष आकर्षण असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या